देगलूर/विशेष प्रतिनिधी
जितेश अंतापूरकर हे त्यांच्या मतदारसंघात एक प्रभावी उमेदवार म्हणून ओळखले जातात. सध्या मतदारसंघात त्यांच्या झंझावत दौर्यामुळे गावागावातील चर्चांमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला आहे. काॅग्रेसच्या उमेदवार व सुभाष साबणें यांच्या तुलनेत भाजपाचे उमेदवार तथा मा.आ जितेश अंतापूरकर हे अधिक सक्षम आणि लोकांशी जोडलेले नेते मानले जातात.
त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे, मतदारसंघातील लोक त्यांच्याच बाजूने आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत त्यांनी केलेले काम जनतेला खूपच भावले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाने विकासाची नवी दिशा पाहिली आहे.
सर्वत्र चर्चा आहे की यावेळी ही जितेश अंतापूरकर हे मोठ्या फरकाने विजयी होतील.आणि मतदारसंघाचा विकासाची गती आणखीन जोमाणे वाढेल अशी चर्चा चालू आहे.त्यांच्या कार्याचा आदर करत, लोकांमध्ये त्यांच्या पुनर्विजयाबाबत निश्चय दिसून येतो. एकंदरीत, जितेश अंतापूरकर यांची लोकप्रियता आणि विश्वासार्हता त्यांना पुन्हा एकदा विजयी ठरवेल, असे मतदारांचे म्हणणे आहे.
