Homeताज्या बातम्यातुरीचे गाळण करताना हल्लेर मशीनमध्ये अडकून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

तुरीचे गाळण करताना हल्लेर मशीनमध्ये अडकून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

देगलूर/प्रतिनिधी

तुर पिकाची गाळणी करताना गळ्यातील टॉवेल हल्लर मशिनमध्ये अडकून तुकाराम रामा कांबळे या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार ता. १५ रोजी तालुक्यातील बेम्बरा शिवारात घडली.
तालुक्यातील बेम्बरा येथील तुकाराम रामा कांबळे (वय-६० वर्ष) हा अहमद अजमोद्दिन शेख रा. बेम्बरा याच्या मशिनवर शनिवार ता. १५ रोजी मजुरीने गावातील शेतकरी देवराव ज्ञानोबा ठावरे यांच्या शेताला तुरीचे गाळण करण्यासाठी गेला होता.
मशिनमध्ये तुरीचे कडबा टाकत असताना अचानकपणे त्याच्या गळयातील टॉवेल मशिनमध्ये अडकला, त्याचवेळी त्या टॉवेलच्या ओढ्याने शरीराच्या भागही मशिनमध्ये अडकला गेला. ही घटना इतकी तात्काळ झाली की, मशीन बंद करण्यासही वेळ मिळाला नाही, त्या अपघातात तुकाराम कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. तुकाराम कांबळे यांच्या पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेत मजूरदार तुकाराम कांबळे हाच घरचा घरातला कर्ता पुरुष असल्याने त्याचे घर उघड्यावर आले असून कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत तुकाराम कांबळे यांच्या मृतदेहाचे हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो पार्थिव देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर बेबंरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पहिल्यांदा उपवासासाठी 6 सुलभ नवरात्र पाककृती

0
नवरात्र कोप around ्यात आहे आणि हिंदू समाजातील बर्‍याच जणांना त्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. हा उत्सव वर्षातून चार वेळा पाळला जातो, परंतु चैत्र नवरात्र...

पहिल्यांदा उपवासासाठी 6 सुलभ नवरात्र पाककृती

0
नवरात्र कोप around ्यात आहे आणि हिंदू समाजातील बर्‍याच जणांना त्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. हा उत्सव वर्षातून चार वेळा पाळला जातो, परंतु चैत्र नवरात्र...
error: Content is protected !!