Homeक्राईमतूपशेळगाव : "प्लॉटचा नाद सोडून दे" म्हणत तरुणाचा खून, दोघांवर गुन्हा दाखल

तूपशेळगाव : “प्लॉटचा नाद सोडून दे” म्हणत तरुणाचा खून, दोघांवर गुन्हा दाखल

लोकवाणी वार्ता 

देगलूर/ शेख असलम

प्लॉटच्या खरेदी-विक्रीच्या जुन्या वादातून तूपशेळगाव येथे एका तरुणाचा डोक्यात दगड लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी देगलूर पोलिसांनी महेश बालाजी बोईवार (वय 30 वर्षे) व शिवाजी निवृत्ती बोईवार (वय 32 वर्षे) या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून शिवाजी बोईवार याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तूपशेळगाव येथील राजेंद्र बापुराव वाघमारे (वय 28 वर्षे) यांनी जानेवारी महिन्यात शिवाजी बोईवार यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचा प्लॉट खरेदी केला होता. मात्र तो प्लॉट राजू सोपान बोईवार यांच्या नावावर असल्याचे खरेदीवेळी लपवण्यात आले होते.

या प्रकरणावरून २ फेब्रुवारी रोजी महेश बोईवार यांनी वाघमारे यांच्या घरी जाऊन “प्लॉटचा नाद सोडून दे” अशी धमकी देत मारहाण केली होती. ५ फेब्रुवारी रोजी वाघमारे हे शहापूरहून हलर घेऊन येत असताना महेश बोईवार आणि शिवाजी बोईवार यांनी त्यांना अडवून भांडण केले.

या भांडणात शिवाजी बोईवार यांनी वाघमारे यांचे शर्ट पकडून मारहाण केली, तर महेश बोईवार यांनी दगड उचलून वाघमारे यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागावर मारून जिवे ठार मारले.‌ गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांना मृत घोषित करण्यात आले.

मयताची पत्नी सविता वाघमारे यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 103, 126 (2), 351(2), 351(3), 3(5) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी बोईवारला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती मुंडे करीत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आर्थर अलेक्झांडर झ्वेरेव, ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना मियामी ओपन उपांत्य फेरीत प्रवेश करते

0
फ्रान्सच्या आर्थर फिल्सने अव्वल मानांकित अलेक्झांडर झेव्हरेव्हला पराभूत केले आणि एका उत्कृष्ट प्रदर्शनासह त्याला 3-6, -3--3, -4--4 ने जर्मनमध्ये जर्मनवर विजय मिळविला. या 20...

आर्थर अलेक्झांडर झ्वेरेव, ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना मियामी ओपन उपांत्य फेरीत प्रवेश करते

0
फ्रान्सच्या आर्थर फिल्सने अव्वल मानांकित अलेक्झांडर झेव्हरेव्हला पराभूत केले आणि एका उत्कृष्ट प्रदर्शनासह त्याला 3-6, -3--3, -4--4 ने जर्मनमध्ये जर्मनवर विजय मिळविला. या 20...
error: Content is protected !!