नायगाव/सदाशिव
मुस्लिम इस्लाम धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला दोन मार्च पासून सुरूवात झाली असून नायगाव तालुक्यातील नरसी येथील सय्यद हसन अजिम. सय्यद हसनैन अजिम या दोन जुळवा दाहा वर्षीय चिमुकल्याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.
रमजान महिन्यात महीला पुरुष यांच्या सह लहान चिमुकुले सुद्धा रोजा(उपवास) ठेवतात यावर्षी दोन मार्च पासून रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे तरीपण या वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना सय्यद हसन.सय्यद हसनैन या दोन चिमुकल्याने पहीला रोजा पुर्ण केला चौदा तास अन्न पाण्याचा त्याग करून रोजा (उपवास) पुर्ण केला जातो व पुर्ण महीना तरावीह मध्ये कुरान पठन केली जाते त्यामध्ये चिमुकले सुद्धा सहभागी होतात.
सय्यद हसन, सय्यद हसनैन यांचा पहीला रोजा (उपवास) असल्याने इफ्तार पुर्वी नविन कपडे फुलांचा हार व मिठाई भरवून शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.नरसी येथील दैनिक विष्णुपुरी एक्स्प्रेस नायगाव तालुका प्रतिनीधी सय्यद अजिम हाजी हुसेनसाब नरसीकर यांचे सह पुत्र आहे .यांनी आपल्या आयुष्यातील पहीला रोजा (उपवास )धरल्याने दोन्ही भावाचा सर्वत्र कौतुक होत आहे .
