*
देगलूर/प्रतिनिधी
सुभाष तेजेराव कदम यांची देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ. श्वेताताई बराराज पाटील वन्नाळीकर यांनी दिले आहे.
सुभाष कदम यांच्या नियुक्तीने पक्ष संघटनेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रसंगी कैलास येसगे (जिल्हा प्रवक्ता), सुभाष अल्लापुरकर (जिल्हा सरचिटणीस), बस्वराज पाटील वन्नाळीकर (माजी जि.प सदस्य)यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कदम यांनी आपल्या या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत पक्षाच्या संघटनात्मक कार्यासाठी अधिक उत्साहाने योगदान देण्याची ग्वाही दिली.
