*देगलूर/शेख असलम*
देगलूर-बिलोली मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसचे उमेदवार निवृत्ती कांबळे यांचा तब्बल 42,999 मतांनी पराभव केला आहे. सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत अंतापूरकरांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे.
2021 मध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेल्या अंतापूरकरांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रहार संघटनेचे सुभाष साबणे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, आणि मुख्य लढत काँग्रेस व भाजप यांच्यात झाली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या अंतापूरकरांनी काँग्रेसचा गड भेदत एकतर्फी विजय मिळवला आहे. या विजयाने भाजपाने या मतदारसंघात आपली ताकद सिद्ध केली आहे.
