नांदेड/प्रतिनिधी
शहरातील गणेश नगर भागात आज सकाळी अमोल भुजबळ या तीस वर्षीय युवकाची खंजरने वार करून निर्घृण हत्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी केली असल्याची घटना घडली असून पोलीस त्या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान अमोल भुजबळ याचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
अमोल भुजबळ उर्फ एमजे वय (30)हा युवक आपल्या दुचाकी वर बसून जात होता.तो काहीतरी घेण्यासाठी दुकानासमोर थांबला असता असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी गणेश नगर रस्त्यावरील वाय पॉईंट जवळ त्याच्यावर खंजरने वार केला. तो आपला बचाव करण्यासाठी पळत होता परंतु हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करीत खंजरने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. हल्लेखोरांनी आपले तोंड झाकले असल्याचे सी. सी. टीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या सह अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दिली. पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.या रस्त्यावर लोकांची वर्दळ होती. जर जागरूक नागरिकांनी या हल्लेखोरांचा प्रतिकार केला असता तर अमोल चा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून होत आहे. परंतु अशा घटना घडत असल्याने जनसामान्यात भीतीचे वातावरण असून कोणीही प्रतिकार करण्यासाठी पुढे येत नाही हे सत्य आहे..
