नायगाव/सदाशिव आंदेलवाड भोपाळकर
नायगाव तालुक्यातील भोपाळा येथे दुसरा टप्पा घरकुल योजनेचा शुभारंभ पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजनेचा दुसरा टप्प्यातील घरकुल योजनेचा भुमीपुजन शुभारंभ करण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील भोपाळा येथे दुसरा टप्पा योजनेणे अंतर्गत लाभार्थ्यांना दि.22 फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात महाडिबीटी मार्फत पैसे जमा झाले होते.
आज दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी लाभार्थ्यांच्या प्लांट वर जाऊन भुमीपुजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित भोपाळा नगरीचे सरपंच प्रतिनिधी देविदास राठोड, ग्रामसेवक वाघमारे सर, माझी सरपंच आनंदराव पाटील बावणे,सुनील गोदमगावे पाटील, विश्वासभर आप्पा स्वामी, राम पाटील, पांडुरंग बनसोडे, मधुकर वाघमारे, संदीप स्वामी आदी उपस्थित होते.
