उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
नांदेड/शेख असलम
लोहा विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देगलूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर यांच्यासह अनेकांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आ. विक्रम काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कंधार – लोहा विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक मजबूत आणि सक्षम करण्याचे मोठ्या नेटाने सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आ. चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अनेक भागातील विविध पक्षातील राजकीय पुढारी , नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. त्यातच देगलूर विधानसभा मतदारसंघातील देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव आखेमोड, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सायलू कोंडेवाड, माजी आमदार कै.गोविंदराव पाटील झरीकर यांचे पुतणे संजय पाटील झरीकर, माजी आमदार कै.गोविंदराव पाटील झरीकर यांचे नातू नांदेड दिशा नियोजन समितीचे सदस्य तथा झरी ग्रामपंचायतचे सरपंच धीरज रणजीतराव पाटील झरीकर, दिगंबर सावकार कौरवार, युवा कार्यकर्ते राहुल विजयराव पेंडकर, योगेश रामदास राऊलवार, किरण सूर्यकांतराव उल्लेवार, योगेश मष्णाजी मैलगिरे, बालाजी राजू नामावार, नागेश अनमुलवार, शुभम तुळशीराम मारकवाड, अनिकेत मोगलाजी अनमुलवार, बालाजी मोगलाजी अनमुलवार यांच्यासह अनेकांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात पक्षप्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.विक्रम काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
