धर्माबाद:- म. मुबशिर
रमजान महिन्याची उत्सुकता सर्व मुस्लिम समाजाला असते परंतु प्रशासक राज असल्यामुळे नगर पालिकेचा गलथान कारभारामुळे पवित्र रमजानच्या महिन्याला ग्रहण लागण्याची वेळ आली आहे.
मागील काही वर्षांपासून रमजानचा पवित्र महिना उन्हाळयात येत आहे.यावर्षी उष्णेतेची तीव्रता पाहता धर्माबाद नगर परिषद मार्फत काही उपाययोजना करायला हव्या होत्या.परंतु त्या पूर्ण होताना दिसत नाही.शहरातील विद्युत पोल बंद आहेत तर नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येऊन शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.गेल्या काही महिन्यापासून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून यामध्ये डेंगुसदृष्य डासांची देखील जास्त प्रमाण आहे.रमजान महिना लक्षात घेता धर्माबाद नगर परिषदेने सर्व प्रभागात फॉगिंग मशीन ने धूर फवारणी करावी,नाल्या साफसफाई करावी, जागो जागी असलेले कचऱ्याचे ढीग गल्ली बोळ्यात सफाई करणारे कर्मचारी कामचुकार पणा करत आहेत.यामुळे सर्व प्रभागात दुर्गंधी पसरत असून शहरातील मस्जिदे समोरील परिसर स्वच्छ करावे,ज्या भागातील विद्युत खाबंवरील विद्युत दिवे बंद असतील ते सर्व विद्युत दिवे सुरू करावे,तसेच महावितरण कंपनीने देखील या महिन्यात मान ठेवत वारंवार होत असलेला विद्युत पुरवठ्याचा लपंडाव थांबवावा व उच्च दाबाने पुरवठा करावा. व तसेच पोलिस प्रशासनाने देखील धर्माबाद शहराची मुख्य जामा मस्जिद समोर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते त्याकरिता पोलिस बंदोबस्त ठेवावा होणारी वाहतुकीची कोंडी टाळावी असे अनेक समस्यांचा निवेदन समस्त मुस्लिम समाजाकडून देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष तोफिक भाई (इज्जु) पत्रकार रज्जाक सर,म. मुबशिर, गोरठेकर मित्र मंडळ शहर अध्यक्ष अयुब भाई,सय्यद बाबर आदींची उपस्थिती होती.
