नांदेड/प्रतिनिधी
मागच्या पाच वर्षात भाजप आमदार राजेश पवार यांनीबेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणारा मतदार संघात एकही उद्योग आणला तर नाहीच उलट विकास कामाच्या नावाखाली टक्केवारी खाऊन विकास कामाचे तीनतेरा वाजवले आहे. त्यामुळे त्यांनी विकास कामाच्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याची जोरदार टिका डॉ. मिनल खतगावकर यांनी केली आहे.
नायगाव विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांनी आक्रमक प्रचार करत आहेत. मतदार संघात मतदारही चांगला प्रतिसाद देत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. धर्माबाद येथे काँग्रेस खासदार ईम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत डॉ. मिनल खतगावकर यांनी जोरदार भाषण करुन दाद मिळवली.
यावेळी त्यांनी अतिशय जोशपूर्ण भाषण करतांना आ. राजेश पवार यांचा सौम्य भाषेत जोरदार समाचार घेतला यावेळी मतदारांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. विकासाच्या नावावर तुम्ही जनतेची फसवणूक करत आहात तुमच्याने विकास करण होत नसेल तर खुर्ची सोडा अन्यथा मतदार तुम्हाला खाली खेचतील असा इशाराही दिला. धर्माबाद तालुक्यात आणि शहरात अनेक विकासाची कामे करणे आवश्यक आहे त्यात औद्योगिक वसाहत आली पाहिजे, 132 के. व्ही चे सबस्टेशन ची आवश्यकता आहे, धर्माबाद शहरात पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाचे पाणी पोहचले पाहिजे, महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारच्या समन्वयातून बाभळी बंधाऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहणार आहे.
अप्पर पैनगंगेचे पाणी धर्माबाद तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पोहचले पाहिजे पण या आमदाराने काम केले नाही, शहरात पंचायत समितीची इमारत, रजिस्ट्री कार्यालयाला इमारत देता आली नाही, शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी, पिक विमा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला नाही, एवढेच नाही तर दिवंगत आ. बापूसाहेब गोरठेकर यांनी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेयही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
मागच्या पाच वर्षात धर्माबाद तालुक्याचा सर्वांगीण विकास करता आली नसल्याने भाजप उमेदवार माझ्यावर टिका करत आहेत. तुम्ही काम केले नसल्याने जनता तुम्हाला विरोधकावर टिका करावी लागते. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याने मतदार तुमची खुर्ची खेचून घेणार असल्याचा जोरदार पलटवार डॉ. मिनल खतगावकर यांनी राजेश पवार यांच्यावर केला आहे.
खा. सुरेश शेटकार खासदार, व्यंकटी श्रीहरीजी, सोमेश रेड्डी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री मोहम्मद शमीम, शिरिष गोरठेकर, गणेशराव करखेलीकर, भास्कर भिलवंडे, सय्यद इसाक, डॉ. मिनाक्षी कागडे, जाके चाऊस, रवी खतगावकर, मतदार संघ प्रभारी सदाशिव पोपूलवाड, दिलीप कदम, नागोराव रोशनगावकर, जावेद सर, निळकंठ ताकबीडकर, माजी. आ. ललिताजी, दशरथ लोहबंदे, हनमंतराव चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
