देगलूर/प्रतिनिधी
येथील बौद्ध स्मशानभूमीत एकच शवदाहिनी जाळी असल्यामुळे शहरातील सबंध बौद्ध समाजाची अवहेलना आणि अडचण होत होती . याची भीम प्रहार संघटनेच्या वतीने दखल घेऊन संघटनेचे अध्यक्ष विकास नरबागे यांनी पालिका प्रशासनाकडे स्मशानभूमीत अजून एक शव दाहीणी यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी केली होती . त्यास पालिकेच्या वतीने प्रोत्साहन देऊन नवीन शवदाहिनी यंत्र बसविण्यात आल्याने ऐनवेळी होणारी समाजाची कुटुंबना नक्कीच दूर झाली आहे .
देगलूर शहरात साधारणतः बौद्ध समाजाची संख्या दहा ते बारा हजाराच्या जवळपास आहे .आणि हा समाज शहरातील अनेक भागात विखुरलेला असल्याने एकाच वेळी विविध भागातील नागरिकांचा मृत्यू झाल्यास येथील बौद्ध स्मशानभूमीमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ एकच शवदाहिनी यंत्र उपलब्ध असल्याने ऐनवेळी दुसऱ्या शवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती यामुळे येथील बौद्ध समाजाची अवहेलना होत होती . समाजाच्या या प्रश्नाकडे भीम प्रहार संघटनेचे अध्यक्ष विकास नरबागे यांनी लक्ष वेधून नगरपालिका प्रशासनाकडे अजूनही एक शव दहन यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली . त्या मागणीला मंजुरी देऊन नगरपालिका प्रशासनाने शहरातील बौद्ध स्मशानभूमीत अजून एक शवदाहिणी यंत्र बसविले आणि ऐनवेळी होणाऱ्या अवहेलनेपासून बौद्ध समाजाची अडचण दूर केली त्यामुळे सबंध बौद्ध समाजाने भीम प्रहार संघटना व पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
