*देगलूर/विशेष प्रतिनिधी*
देगलूर – बिलोली राखीव विधानसभा मतदार संघांचे सेवा जनशक्ती पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश कदम यांच्या प्रचारासाठी सर्व जाती धर्मातील मित्रांनी मदतीचा हात पुढे करीत गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेत शिलाई मशीन या चिन्हाचा प्रचार करीत मंगेश कदम यांना मतदान करण्याचे आवाहन करत सर्व जाती धर्मातील मित्रांनी मित्र काय करू शकतात एका मित्राला आमदार करू शकतात असे म्हणत आपल्या मित्राचा प्रचार करण्यासाठी सर्व मित्र मैदानात उतरल्याने जनतेतून आता मंगेश कदम यांच्या साठी मैदानात उतरले सर्व मित्र, देगलूर – बिलोली मतदारसंघाचे बदलणार आता चित्र असे ऐकावंयास मिळत आहे.
मंगेश कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात विधानसभेचे इच्छुक उमेदवार म्हणून फिरत आहेत. गेल्या पोट निवडणुकीत हि त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. परंतु वारंवार शब्द देऊनहि तो पाळल्या जात नसल्याने त्यांनी पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. देगलूर – बिलोली हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने या निवडणुकी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल असे वाटले असताना ऐनवेळी काँगेस पक्षाशी गदारी करून भाजप मध्ये प्रवेश केलेल्या अंतापूरकर यांना भाजपने हि जागा सोडवून घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा मंगेश कदम यांच्यावर अन्याय झाला. त्यामुळे सर्व समाजातील त्यांच्या मित्रमंडळीने त्यांना प्रा. मनोहर धोंडे यांच्या सेवा जनशक्ती पक्षाला सोबत घेत अपक्ष निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. मंगेश कदम यांचे सर्व समाजाशी चांगले संबंध असून या मतदारसंघात त्यांचे सर्व जाती धर्मातील मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात आहेत. आता हे सर्व मित्र आपल्या मित्रासाठी एक झाले आहेत. या सर्व मित्रांनी शहरी व ग्रामीण भाग पिंजून काढीत मंगेश कदम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. माजी आमदाराविषयी जनतेत मोठी नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे मतदारसंघात आता परिवर्तन अटळ असून मंगेश कदम सारख्या नवीन व अनुभवी चेहऱ्यास निवडून आणण्यासाठी जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
