*देगलूर/प्रतिनिधी*
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसह महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी, शनिवारी देगलूर शहरात मतदार जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामागील उद्देश मतदानाची टक्केवारी वाढवणे व मतदारांना अधिक जागरूक करणे हा आहे.
या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, जागरूक मतदार आणि अराजकीय व्यक्तींनी सहभागी होऊन राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन स्वीप कक्ष, तहसील कार्यालय देगलूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तहसील कार्यालय देगलूर येथे शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता आपल्या मोटारसायकलसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
