देगलूर/प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी आणि सुशीलकुमार देगलूरकर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर शुक्रवार, दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ, देगलूर येथे होणार आहे. या उपक्रमाद्वारे महामानवाला अभिवादन करताना समाजातील गरजूंसाठी रक्तदानाचे महत्व अधोरेखित करण्यात येणार आहे.
या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून महामानवाला आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
