देगलूर/प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही देगलूर येथे वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
“फुल आणि हारांऐवजी एक वही, एक पेन” या संकल्पनेतून गरजू, होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे.हा
उपक्रम 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर होणार आहे. विद्यार्थ्यांना पोहोचवले जाणारे साहित्य त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. विकास दत्ताजी नगबागे यांच्या नेतृत्वाखाली भिमप्रहार सामाजिक संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले असून, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जनतेने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
