देगलूर/विशेष प्रतिनिधी
मा.आ.जितेश अंतापूरकर हे विधानसभा निवडणुकीसाठी एक सर्वोत्तम उमेदवार आहेत. त्यांची प्रतिमा एक संवेदनशील,शांत,अविरत परीश्रमी आणि सर्वसामान्य जनतेला जोडलेली असणाऱ्या नेत्याची आहे. जितेश अंतापूरकर यांनी त्यांच्या संपूर्ण मतदारसंघात खूप चांगले कार्य केले आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते विकास, आणि महिला सशक्तीकरण यासारख्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबाजवणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
जितेश अंतापुरकर यांनी मतदारसंघातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी प्रादेशिक लाॅजिस्टिक हब मंजूर करुन आणले. यामुळे अनेक तरुण-तरुणींना त्यांच्या भविष्याची दिशा मिळाली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष कार्यवाही आणि महिला सशक्तीकरण योजनेचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर मा.आ.अंतापुरकर यांनी भर दिला आहे. त्यांनी आरोग्याच्या सुविधांवर देखील विशेष लक्ष दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयांची सुविधा सुधारून, सामान्य जनतेला त्वरित आरोग्यसेवा मिळण्यास ते कटिबद्ध आहेत.
जितेश अंतापूरकर यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघातील अनेक गावांचा विकास वेगाने होत आहे. पायाभूत सुविधा सुधारण्याबरोबरच, त्यांनी जलसंधारण, शेतीविकास, पर्यावरण संरक्षण यांसारख्या क्षेत्रांत देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा झाला असून, शेतीमध्ये नवे प्रयोग आणि अधिक उत्पादनक्षमतेला चालना मिळाली आहे.
जितेश अंतापुरकर यांचा कार्यपध्दत आणि त्यांच्या कामाची उर्जा बघता, ते विधानसभा मतदारसंघासाठी सर्वोत्तम उमेदवार ठरतात. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात एक उज्ज्वल भविष्य आणि प्रगतीची दिशा निश्चित आहे.
