Homeक्राईमरामतीर्थ : जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड, आठ जणांवर गुन्हा दाखल

रामतीर्थ : जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड, आठ जणांवर गुन्हा दाखल

नांदेड/शेख असलम

नायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले, तर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिसरातील नागरिकांनी ठाण्याला सक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

रामतीर्थ पोलीस ठाण्याचा तपास आणि कारभार वादग्रस्त
रामतीर्थ येथील मुख्य रस्त्यावरील एटीएम चोरीच्या 20 लाख रुपयांच्या प्रकरणाचा तपास आजपर्यंत अपूर्ण असून इतर चोऱ्यांचे तपासही प्रलंबित आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या ठिकाणी अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याने पोलीस ठाण्याची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
कंधार भागात जात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अशिष बोराटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धानोरा शिवारातील कॅनालच्या बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी गोलाकार बसून जुगार खेळणाऱ्या चार इसमांना ताब्यात घेण्यात आले, तर चार आरोपी पळून गेले.

ताब्यात घेतलेले आरोपी 1. राहुल लक्ष्मण पांचाळ (रा. बेळगे नगर), 2. रामदास श्रीधर पांचाळ (रा. हिप्परगा), 3. विश्वनाथ गंगाधर गोरे (रा. ताकबीड), 4. शुभम गंगाजीराव ताटे (रा. मुगाव) पळून गेलेले आरोपी 1. सुनील जाधव (रा. कांडाळा), 2. प्रकाश कांबळे (रा. कांडाळा), 3. साईनाथ कदम (रा. कांडाळा), 4. बालाजी कोटुरवाड उर्फ सावकार (रा. कांडाळा) मुद्देमाल: 52,500 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 च्या कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस ठाण्यात सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आर्थर अलेक्झांडर झ्वेरेव, ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना मियामी ओपन उपांत्य फेरीत प्रवेश करते

0
फ्रान्सच्या आर्थर फिल्सने अव्वल मानांकित अलेक्झांडर झेव्हरेव्हला पराभूत केले आणि एका उत्कृष्ट प्रदर्शनासह त्याला 3-6, -3--3, -4--4 ने जर्मनमध्ये जर्मनवर विजय मिळविला. या 20...

आर्थर अलेक्झांडर झ्वेरेव, ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना मियामी ओपन उपांत्य फेरीत प्रवेश करते

0
फ्रान्सच्या आर्थर फिल्सने अव्वल मानांकित अलेक्झांडर झेव्हरेव्हला पराभूत केले आणि एका उत्कृष्ट प्रदर्शनासह त्याला 3-6, -3--3, -4--4 ने जर्मनमध्ये जर्मनवर विजय मिळविला. या 20...
error: Content is protected !!