देगलूर/शेख असलम
देगलूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी सतत पुढे असणारे युवा नेतृत्व विक्रम सुभाषराव नागशेट्टीवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश “साई सुभाष” जनसंपर्क कार्यालय, वसंतनगर, नांदेड येथे पार पडला.
विक्रम नागशेट्टीवार यांच्या पक्षप्रवेशामुळे देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव युवा वर्गातही वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशानंतर विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, दिगंबर कौरवार, तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षबांधणीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
