लोकवाणी वार्ता
आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन.
देगलूर/ प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील शहापूर गावात मातंग समाज मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार जितेश अंतापूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्यास गावकरी, परीसरातील नागरिक तसेच भाजप व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन या मंदिराचे उभारणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे समाजाच्या एकात्मतेला बळ मिळेल असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या वेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदार अंतापूरकर यांच्या या सामाजिक कार्यासाठी विशेष आभार मानले.
