देगलूर/शेख असलम
शिवजन्मोत्सवानिमित्त आज पासून दि. 17 ते 19 फेब्रुवारी असे तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास तमाम शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव समिती व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिवस्मारक येथे तीन दिवशीय भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी आ. जितेश अंतापुरकर हे राहणार आहेत. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक डी.आर.कळसाईत, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी,कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी व्याख्याते प्रसाद महाराज काष्टी यांचे शिवचरित्रावर कीर्तन होणार आहे.
मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांचा शिवरत्न सन्मानाने सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र चव्हाण राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जितेश अंतापूरकर, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, जि. प. चे कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, डीवायएसपी संकेत गोसावी, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक मारुती मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.यावेळी कृषी अधिकारी विठ्ठल गीते, बि. डि.ओ. शेखर देशमुख, कृषी अधिकारी विकास नागरीकर हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी संस्कृतिक कार्यक्रम तर सायंकाळी ७ वाजता नीलेश जगताप यांचे व्याख्यान होणार आहे.
बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता जिजाऊ वंदनेनंतर डॉ. सुनील जाधव यांचा शिवगीतांचा कार्यक्रम होणार असून १० वाजता जागृती विद्यालय लिंगनकेरुर येथील विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ होणार आहेत. महाप्रसादाच्या वाटपानंतर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी शिवस्मारकावर विद्युत रोषणाई व अतिषबाजी केली जाणार आहे. शहरासह परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
