देगलूर/प्रतिनिधी
कुर्ला पोस्ट ऑफिस येथील कर्मचारी असलम खान यांचे पुत्र हुजेफा खान या विद्यार्थ्याने 2 रोजी आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) केला आहे.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवतात. मन व शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग असल्यामुळे मुस्लिम धर्मात रोजाला विशेष महत्त्व आहे. यंदाचा
रमजान महिना हा मार्च महिण्यात कडक उन्हाच्या तापमानात आल्याने याही परिस्थितीत चिताकॅम्प ट्राबे येथील इयत्ता पहिली वर्गात शिक्षण घेत असलेला अवघ्या सात वर्षाचा हुजेफा असलम खान या विद्यार्थ्याने दिवसभर पाण्याचे थेंबही प्राशन न करता आपल्या आयुष्यातला पहिला रोजा (उपवास) पूर्ण केले असल्याने त्याचे परिसरात कौतुक होत आहे.
