दत्ता पा.बेटमोगरेकर थेट तहसीलदारासोबत शेतकऱ्यांचा बांधावर
मुखेड/मुस्तफा पिंजारी
गेल्या दोन तिन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसाने जोर धरत जिल्ह्यासह मुखेड तालुक्यात हाहाकार माजवला असुन यात बेटमोगरा परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाच्या थैमानामुळे बेटमोगरा येथील मन्याळ नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून नदी काठी असलेली शेकडो एकर जमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेली सर्व पिके वाहून गेली. आदीच दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा मुग,उडिद,सोयाबीन यांसारख्या हाताशी आलेली पिके निसर्गाने हिसकावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यासंदर्भात काल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील बेटमोगरेकर यांनी या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करुन तहसीलदार यांना नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावे असे लेखी निवेदन दिले होते. याच निवेदनाची दखल घेत तहसीलदार राजेश जाधव यांनी दत्ता पाटील बेटमोगरेकर यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून बाधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील बेटमोगरेकर, पो.पा.रमेश पाटील,प्रविण पाटील, परमेश्वर खपाटे, विठ्ठल मुदळे,माधव पाटील सह आदींची उपस्थिती होती.
