नांदेड/प्रतिनिधी
आज 1 जुलै रोजी डॉक्टर डे दिना निमित्त आणि रोटरी वर्षाची सुरुवात डेंटल फ्री चेक अप कॅम्प ने करण्यात आली. गुरुकुल इंग्लिश शाळेत वर्ग 4 ते 8 वी पर्यंत च्या 323 विध्यार्थ्यां ची दातांची तपासणी मोफत करण्यात आली. ह्या पैकी 10 ते 15% विध्यार्थ्यांना डेंटल इन्फेकशन (caries)व वाकडी दातांची ठेवणं दिसून आले. सर्वांना योग्य मार्गदर्शन करून मोफत टूथपेस्ट वाटण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिन्सिपॉल सौं कुलकर्णी मॅडम आणि सर्व कर्मचारी वृंद, रो. मालिवाल ( अध्यक्ष )’ डॉ मालू ( सेक्रेटरी ),रो. नांदेडकर, रो. बंग,रो. जवळगावकर रो. प्रशांत, रो. नलबलवार, रो. मामींडवार,रो. अंबुलगेकर,रो चंदूसेठ, रो. येवतिकर, रो. कालाजी,रो. भास्कर,रो. भूतडा, रो. भारतीया,ह्यांनी परिश्रम घेतले.
रोटरी क्लब नांदेड तर्फे सर्व डेंटल सर्जन रो. डॉ शिवराज देशमुख,डॉ सौं व डॉ श्रेयश गिलडा, डॉ. सौं. हेंगडे, डॉ. सायली ह्यांचे हार्दिक आभार मानले.तसेच रोटरी क्लब च्या वतीने नवीन वर्षात विविध समाज उपयुक्त प्रकल्प घेण्याचा निर्धार केला आहे.
