देगलूर/प्रतिनिधी
मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर ची २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी नूतन कार्यकारणीची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले त्यात अध्यक्षपदी लक्ष्मण मालगिरवार तर कार्यवाह पदासाठी नागोराव उत्कर यांची निवड करण्यात आली ही निवडणूक समर्थ वाचनालय देगलूरच्या सभागृहात दि.६ जुलै रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देविदास फुलारी तर निरीक्षक म्हणून मसापचे जिल्हा अध्यक्ष बालाजी ईबितदार व प्रा. महेश मोरे यांनी काम पाहिले.
निवडणूक प्रक्रियेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी देविदास फुलारी यांनी निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा मांडली. मावळते अध्यक्ष लक्ष्मण मलगिलवार यांनी त्यांच्या कार्यकाळाचा आढावा सादर केला यानंतर नूतन कार्यकारणीच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करून सदरील कार्यकारणी बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देविदास फुलारी यांनी जाहीर केले.
मसाप देगलूर शाखेची नूतन कार्यकारणी खालीलल प्रमाणे आहे.
अध्यक्ष – लक्ष्मण मलगिरवार, उपाध्यक्ष- प्रा. सर्जेराव रणखांब व डॉ. मिलिंद शिकारे,
कार्यवाह – नागोराव उत्कर, सहकार्यवाह- फजल मुल्ला, कोषाध्यक्ष- माधव देशमुख,
सदस्य- एस एल देशमुख,प्रा.शिवचरण गुरूडे, पांडुरंग पुठ्ठेवाड,प्रा.महेश कुडलीकर,सुभाष हिवराळे.यांचा समावेश मसापच्या नुतन कार्यकारणीत करण्यात आला.
नांदेड जिल्हा कार्यकारिणी नंतर जिल्ह्यात सर्वात मोठी व कार्यरत म्हणून मसापची देगलूर शाखा प्रसिद्ध आहे मात्र देगलूर तालुक्यातील साहित्यिकांना केंद्रीय कार्यकारिणीत स्थान का नाही? अनेक नवोदित कवी,लेखक व साहित्यिकांना व्यासपीठ मीळत नाही,मसापचे मासीकअंक सभासदांना पोहचत नाही, मसापच्या विविध कमीटीवर देगलूरच्या साहित्यिकांची निवड नाही, देगलूर हे संत साहित्याची भुमी आहे व अनेक दिग्गज साहित्यिकांची खान आहे त्यामुळे मोठे साहित्यीक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मसापचे सहकार्य असावे असे विविध प्रश्न उपस्थित करून देगलूरकरांनी आपल्या व्यथा मांडल्या.
