देगलूर/प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी मौ,येरगी येथे आयोजित महिलांच्या आरोग्य शिबिरात 215 महिला व किशोरवयीन मुलींची तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी ही आरोग्य हितकारक समाज व्यवस्था निर्माण करण्याचे संस्कार मुळातच असण्याची गरज ग्रामीण क्षेत्रात आजघडीस आवश्यक आहे. याच दिशानिर्देशाचे पालन करणारी येरगी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रात नव्हे तर देशात आघाडीस आहे.
ग्राम स्वच्छता, घंटा गाडी, पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, या सारख्या आरोग्य सहाय्य करणा-या घटकांना अग्रस्थानी ठेवून गावातील तरुण, वृद्ध ,माता भगिनीच्या आरोग्य तपासणी साठी निःशुल्क शिबिराचे आयोजन येरगी ग्रामपंचायत ने आयोजिले होते.
आरोग्य केंद्र येरगीच्या वतीने जिल्हा प्ररिषद शाळेत दिनांक 20 व 21 जुन 2025 रोजी येरगी ग्रामपंचायत च्या वतीने 12 ते 55 वयोगटातील महिला व किशोर वयीन मुलींचे व महिलांचे ॲनिमिया ( रक्त अल्पता ) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील एकूण 420 पैकी 215 महिला व किशोर वयीन युवतींनी, गरोदर मातांनी या शिबिराचा लाभ घेतला असून उर्वरित महिलांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.
ॲनिमिया (रक्त अल्पता ) शिबिरात HB तपासणी, BP तपासणी, शुगर तसेच CBC तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 215 स्त्रियांची व मुलींची तपासणी करण्यात आली. त्यांना औषधोपचार करण्यात आला असून ॲनिमिया ग्रस्त महिलांना प्रशिक्षण देऊन पोषण हे परसबागेच्या माध्यमातून ॲनिमिया मुक्त करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न ग्रामपंचायत येरगी ता.देगलूर ही करणार आहे.
या शिबीरा प्रसंगी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, सरपंच संतोष पाटील येरगीकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक बरसमवार, विश्वनाथ बागेवार, अशोक वाघमारे, शालेय शिक्षण समिती सदस्य रमेश गटावार, मुख्याध्यापक अशोक देवकत्ते, तंटामुक्त सायलू कांबळे, येरगी आरोग्य उपकेंद्रचे डाॅ.किरण ठाकरे, डाॅ.कविता मोरे, आरोग्य केंद्रातील आरोग्य विस्तार अधिकारी अशोक विद्देवार, माधव ईज्जरवार, आदी आरोग्य साहाय्यक, सर्व कर्मचारी, सिस्टर, MPW, आशा, ANM, आशा सेविका या सर्वांनी या शिबीराला यशस्वी होण्याकरीता परिश्रम केले आहेत.
