शहापूर/प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त शहापूर येथे मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गावातील विठ्ठलेश्वर मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची पूजा-अर्चा करून प्रतिमेला पालखीमध्ये बसविण्यात आले. त्यानंतर टाळ, मृदंगाच्या गजरात व भक्तीगीतांच्या वातावरणात गावातील मुख्य रस्त्यावरून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
या सोहळ्याला उपसरपंच गणेश चामावार, दशरथ दोगलवार, मलू गुरुजी यालावार, नारायण पोतदार, शकर गुतापले, हनमलू भेलदार, सुरेश ठक्कनगार, संदेश चामावार, नंदकुमार यालावार, विलास यालावार, गाधी कनकनटे, नागना चिचलपले, कमलेकर गुरुजी, सायलु कुंभार, सायलु मठमवार, तलाठी यालावार, भगनुरे, मारोती पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला भजनी मंडळ तसेच गावातील प्रौढ व तरुण मंडळींच्या सहभागामुळे पालखी सोहळ्याला विशेष रंगत आली. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज जयंती सोहळा गावात अविस्मरणीय ठरला.
