देगलूर/प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्य सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठी अस्मितेवर घाला घालण्यात आला आहे, असा आरोप करत देगलूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी संतप्त आंदोलन छेडले.
आज दिनांक 29 जून रोजी सकाळी 11 वाजता अण्णा भाऊ साठे चौक येथे शासनाच्या हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करण्यात आली. त्यानंतर भाजपचे माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकरीविरोधी आणि महिलांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे, संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, विधानसभा प्रमुख पांडुरंग पाटील थडके, शहरप्रमुख संजय अण्णा जोशी, अल्पसंख्याक सेना तालुकाप्रमुख युसुफ मिस्त्री, शहरप्रमुख सय्यद मिर सय्यद हनुमिया, उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना समन्वयक संतोष कांबळे, उपशहरप्रमुख संदीप शिंदे, गणेश चप्पलवार, राहुल सोनकांबळे, उपविभागप्रमुख हाणमंत राजुरे, सुभाष खुनेवाड, शंकर जाधव हाळीकर, गंगाधर पुंजपवार यांच्यासह मनसेचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण मंगनाळे, तालुकाप्रमुख मन्मथ खंकरे, विश्वंभर कंतेवार, चंदू अंक्यमवार, चाॅदपाशा, तालुका उपाध्यक्ष हनुमंत उच्च, खानापूर सर्कल प्रमुख आनंद कामशेट्टी, नागेश पल्ला, मोगलाजी वल्लपवार, माजी शहराध्यक्ष विश्वंभर कंतेवार, तालुका संघटक शेख आजार, शहर उपाध्यक्ष शेख चांद आदींचा सहभाग होता.
यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना, मनसे व युवासेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या वेळी हिंदी सक्तीचा तीव्र निषेध करत “मराठीचा अपमान खपवून घेणार नाही”, “हिंदीचा जुलूम बंद करा”, “लोणीकर माफी मागा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडले जाईल आणि सरकारने हा आदेश तात्काळ मागे घ्यावा.
