Homeक्राईमहिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त

हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही

नांदेड/प्रतिनिधी

सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी केली. तपासणी वेळी मे. प्रणव किराणा स्टोअर्स, दीक्षाभूमी चौक, हिमायत नगर या पेढीतून दीपक हरिश्चंद्र अमृतसागर वय वर्ष २८ रा. कालिका नगर हिमायत नगर या व्यक्तीच्या ताब्यातून राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, मुसाफीर पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण २७ हजार ६८८ रुपये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला. संबंधित हजर व्यक्ती दीपक हरिश्चंद्र अमृतसागर वय वर्ष २८ रा. कालिका नगर, हिमायतनगर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०(२)(अ),५९ भारतीय न्यायसंहितेच्या १२३,२२३,२७४,२७५ कलमानुसार पोलीस स्टेशन, हिमायत नगर येथे फिर्याद दाखल केली आहे.
तसेच मे.सलीम किराणा स्टोअर्स, खुबा चौक, हिमायतनगर या पेढी तपासणी वेळी राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, सागर पानमसाला, गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा एकूण १ हजार ९५० रुपये एवढ्या किंमतीचा साठा आढळला. या पेढीतील हजर व्यक्ती अब्दुल अहमद लाल मोहम्मद वय वर्ष ४७ रा. सुभाष चौक, हिमायतनगर व पेढी मालक अब्दुल जब्बार अब्दुल मजीद खुबा चौक, हिमायतनगर यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी, अनिकेत भिसे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६चे कलम २६,२७,३०(२)(अ),५९ भारतीय न्यायसंहितेच्या १२३,२२३,२७४,२७५ कलमानुसार पोलीस स्टेशन, हिमायतनगर येथे फिर्याद दाखल केली आहे.
तपासणी नंतर सदर दोन्ही पेढी सील करण्यात आल्या. सदरची कार्यवाही सहायक आयुक्त राम भरकड व सहायक आयुक्त संजय चट्टे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलीस निरीक्षक अमोल भगत व इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1759742555.4A7B3D9A Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5C173317.1759724387.48002AB5 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1759706227.46e7fc41 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1759688189.43bfce9e Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1759670073.3dad1ae0 Source link

error: Content is protected !!